जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद
सेलू
खेळ हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून खेळामधुन जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, यश, अपयश, टिका, कौतुक, बलोपासना,आरोग्य ही जीवनमूल्ये विद्यार्थांच्या अंगी विकसित होतात त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मैदानावर खेळवण्यासाठी पाठनावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवार दिनांक ४ आक्टोबर रोजी आयोजित जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाधिकारी राहूल औंढेकर, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक रासकटला, प्रा. नागेश कान्हेकर, हुलगिरे, सय्यद सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालूका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर प्रा. नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.
सामनाधिकारी म्हणून राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, कपिल ठाकूर, झिशान सिद्दिकी,योगेश आदने,भरत घांडगे, रामा गायकवाड, प्रा रवी दवे, कैलास टेहरे,अमर सुरवसे,आदित्य आडळकर,नाविद शेख आदींनी परीश्रम घेतले जिल्हा भरातून १७ वर्षे वयोगटातील १४संघांनी सहभाग नोंदवला