आज दिनांक 25 11 2024 रोजी सकाळी 08 वाजता फुलेनगर मधील अनिता सखाराम पारदे यांच्या घरासमोरील रोडवर मुलीला ट्युशनला सोडण्यासाठी जात असताना श्याम शंकरराव करडे,विजय शंकरराव करडे,किरण किशोर करडे,सतीश शाम करडे राहणार फुलेनगर या चार इसामांकडून महिलेस मारहाण करण्याची घटना घडली आहे. यातील विजय करडे यांनी खिशातून लहान आकाराचा चाकू काढून अनिता यांच्या डाव्या दंडावर मारून जखमी केले सदरील घडलेल्या घटनेचा सेलू पोलीस ठाणे येथे अनिता सखाराम पारदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व पुढील तपास पोलीस हवालदार तेलंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.