(प्रतिनिधी सतिष आकात)
दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सेलू ते परतुर रोड जवळील हदगाव खुर्द शिवारातील रामदास बाबासाहेब पावडे यांच्या शेतामध्ये दोन अज्ञात चोरट्यांची चाहूल लागताच सेलू पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर सेलू येथील पोलीस प्रशासन हदगाव येथे गेले असता गावकऱ्यांच्या मदतीने सापळा रचून चोरी करायच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले या ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपी हे रियाज खान फिरोज खान वय 19 वर्ष राहणार पणजीतन मोहल्ला,जमा मज्जित जवळ,परतुर व कृष्णा दिलीप भोरे,वय 25 वर्ष,राहणार आदर्श नगर,सेलू या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले यांच्याकडून जवळपास 50 ते 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर एक दू चाकी यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.यावेळी पोलीस हवालदार काशिनाथ मुलगीर,सोपान दुबे,अनिल,शेवाळे,गजानन जायभाय, जगनाथ मुंडे यांनी दोन्ही चोरटय़ांना ताब्यात घेतले गणेश ज्ञानोबा पावडे यांच्या फिर्यादीनुसार व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला..