मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन…
सेलू
अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलुत ०३डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
सेलु उपजिल्हा रुग्णालयात आयेाजित केली आहे.सेलु तालुका मराठी पत्रकार व उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यामध्ये विविधि प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेतयाच शिबीरात इच्छूक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची तसेच दिवयांग बंधुची तपासणी त्याच बरोबर पोलिस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन देखील करण्यात आले आहे. या शिबीराचा तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेलु तालुका मराठी
पत्रकार संघ आणि उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ जनार्दन गोळेगावकर यांच्या
वतीने करण्यात आले आहे.
या शिबीरात शुगर, बीपी, इसीजी या बरोबरच सीबीसी, एचबीएवनसी, लिपीड प्रोफाईल, थायराईड प्रोफाईल, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन एचपीएलसी आदींसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. शिबीराची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार आहे.या शिबीरात रुग्णांची तपासणी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांच्या आरोग्याची तपासणी करण्याची संकल्पना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी मांडली असून त्यानुसार संपूर्ण राज्यभरात पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येते. राज्यभरातल्या हजारो पत्रकारांची तपासणी करण्यात येते.सेलु तालुक्यातील पत्रकार, पत्रकार क्षेत्राशी संबंधित सर्व व त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन
सेलु उपजिल्हा रुग्णालय व सेलु तालुका मराठी पत्रकार
संघाच्या वतीने करण्यात आले आहे.