सेलू तालुक्यातील डिग्रस पौळ या गावातील एका युवकाचा आईने शेत गट क्रमांक 204 या शेती वर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके कडून तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाची परत फेडीची चिंता व शेतात होत असलेले सतत नापीक मुळे चिंत्तेत राहून दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील घटनेची खबर संदीप श्रीरंगराव पौळ यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार जानगर यांच्याकडे देण्यात आला..