सेलु येथील एक कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना तालुकाप्रमुखाने लिहीले स्वतः च्या रक्ताने देशाचे नेते अमित शाह यांना पञ ..
(प्रतिनिधी सतिष आकात)
विधानसभा होऊनही बरेच दिवस असून महायुती अजून आपल्या नवीन मुख्यमंत्रीची निवड अजूनही केलेली नाही मागील काही दिवसापासून चालू असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी नावाची चर्चा ला काही पूर्णविराम लागत नाही या अनुषंगाने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून सेलू येथील शिवसेना तालुकाप्रमुख पवन घुमरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ भाई शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंञी करावे अशी विनंती देशाचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांना स्वताच्या रक्ताने पञ लिहुन विनंती केली आहे..
या पत्रात असे लिहिले आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वा मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यश हे केवळ एकनाथ शिंदे यांच्या मुळेच आपण म्हणू शकतो तरी आपणास नम्र विनंती करतो की आपण निसंकोच त्यांच्या नावावर पुनश्च मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवावी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करावी करिता रक्त पेशीत विनंती केली आहे