
सेलू येथील नितीन कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमिपूजन ५ जानेवारी रोजी सकाळी १९ वाजता नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या वेळी अध्यक्षीय समारोप करताना सेलू-पाथरी मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले की, स्वर्गीय नितीन क्रिकेट स्पर्धेचे हे २५ वे वर्ष आहे. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मोठा आनंद होत आहे. आतापर्यंत क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना बक्षीस दिले जायचे. परंतु यावर्षीपासून खेळाडूंच्या बक्षिसासोबतच क्रिकेट सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आकर्षक स्वरूपाचे बक्षीस दिले जाणार आहे. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात या स्पर्धा घेण्यात येतात. म्हणून संपूर्ण सेलू शहर क्रिकेटमय होत असते. हे वर्ष तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागील २५ वर्षांत क्रिकेट हा खेळ सेलू शहरात वाढलेला आहे. आता या रौप्य वर्षानिमित्त खेळाडूंना प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांनाही आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. स्वर्गीय नितीन चषक क्रिकेट स्पर्धेतून खेळणारे खेळाडू आयपीएल, रणजी, महाराष्ट्र टीममध्ये खेळत आहेत. याचा सार्थ अभिमान आहे. या खेळपट्टीवर खेळणारा खेळाडू आज भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे

.