
श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिन उत्साहात साजरा…
सेलू (ता.07) रोजी येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, ज्येष्ठ पत्रकार श्री. नारायण पाटील, श्री. राम सोनवणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण बागल, मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया अध्यक्ष सतिश आकात डॉ. विलास मोरे, श्री. मोहन बोराडे, श्री. दिलीप डासाळकर, श्री. शिवाजी आकात, मोहम्मद इलियास, श्री. संजय मुंडे, श्री. जयचंद खोना, मोहसीन मामू, श्री. शिवाजी शिंदे, निरज लोया, निशिकांत रोडगे, आबरार बेग, दीपक जडे, संदीप वरकट आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. संजय रोडगे म्हणाले की, 2025 हे वर्ष श्रीराम प्रतिष्ठानचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे. ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी विकासाला वाव असतो. परंतु कष्ट करत असताना इमानेइतबारे केले तर नक्कीच जीवनामध्ये यश प्राप्त होते. जीवनामध्ये समाजासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आम्ही जे काही संस्थेच्या माध्यमातून काम करतो त्याला आपल्या लेखणीतून समाजापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचविण्याचे काम आपण करत आहात त्यामुळे एक चांगली ओळख निर्माण होण्यासाठी मदत होत असते. ज्याप्रमाणे सेलु शहराची जी सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण झालेले आहे ते केवळ आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात झालेली आहे. यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. समाजापर्यंत रोजच्या होणाऱ्या घटनाक्रम आपल्या माध्यमातून यशस्वीरित्या समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या हातून होत राहो अशा यावेळी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री. राम सोनवणे श्री. विलास मोरे व मोहम्मद इलियास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिगंबर टाके यांनी केले तर आभार प्रा. महादेव साबळे यांनी केले.