
सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आठवडी बाजार भरला होता. आठवडी बाजार भरण्याचे कारण असे की गणितातील काही संकल्पना लक्षात याव्यात जसे की लिटर, किलो, ग्रॅम ,यासंदर्भातली माहिती व रोजच्या दैनंदिन जीवनात याचा वापर शेतकऱ्यांचा व्यवहार व त्यांची मेहनत हा आठवडी बाजार भरण्याची प्रमुख कारण होते या आठवडी बाजारसाठी प्रमुख म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे सर व संस्थेच्या सचिव डॉ . सविता रोडगे मॅडम हे आवर्जून उपस्थित होते. तसेच उत्कर्ष विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री कैलास ताठे व ज्ञानतीर्थ माध्यमिक विधायलायचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे ही उपस्थित होते.
या आठवडी बाजारात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सदरील उपक्रम हा गणित विषयांतर्गत घेण्यात आला होता या उपक्रमासाठी गणित विषयाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले