
सेलू:- नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 15 जानेवारी रोजी नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगणावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंतराव काळे यांच्या शुभहस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मंडळाचे अध्यक्ष मा. आ. हरिभाऊ काका लहाने ,प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड दत्तराव कदम , प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश जी बिहाणी, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, डॉ.अशोक नाईकनवरे, मा.सभापती कृ. उ. बा.स. दिनकर वाघ, जिल्हा सचिव अब्दुल रहिम, आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष बोबडे म्हणाले की गेल्या 25 वर्षापासून सातत्याने चालणारी ही मराठवाड्यातली पहिली क्रिकेट स्पर्धा असून या क्रिकेट स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहे ,संदीप भैया ने जमीन दिल्यास या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या वतीने एक सुंदर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येईल याचा संपूर्ण खर्च राज्य संघटना वतीने करण्यात येईल असे सांगितले.
उद्घाटक यशवंत काळे म्हणाले सातत्यातून कुठलीही गोष्ट यशस्वी होते याचे ज्वलंत उदाहरण नितीन क्रीडा मंडळाने पंचवीस वर्षापासून चालवलेल्या क्रिकेट स्पर्धेचे आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

कार्यक्रमाचा अध्यक्ष समोर माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदीप भैय्या लहाने यांनी केले याप्रसंगी संदीप भैया लहाने यांच्यावतीने विविध क्रिकेट क्लबला गणवेश वाटप करण्यात आला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षकांनाही आकर्षक सायकलचे बक्षीस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नागेश कानेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी साठी शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर अविनाश शेरे पांडुरंग कावळे , गणेश माळवे,क्रीडा शिक्षक राजेश राठोड स्वप्निल राठोड, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत
सलामी सामना परभणी पीडीसी विरुद्ध आदर्श बीड दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक जिंकून प्रथम परभणी पीडीसी संघा ने 17 षटकात सर्व बाद 136 धावा केल्या. यात अहमद खान 36 धावा, सोहेल श्रीखंडे 58 धावा तर सोहिल जिंतूरकर 12 धावा करत तंबूत परतले.
आदर्श बीड करून भेदक मारा मोमीन नासेर 04 गडी बाद केले तर जय 03 गडी बाद केले.