
दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 01.15 वाजेच्या सुमारास हादगाव पावडे शिवारामध्ये उभा असलेल्या अर.बी घोडके .इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील हायवा इतर वाहनासोबत लॉक करून उभा असलेला हायवा क्रमांक MH 22AM 2903 कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरून नेला म्हणून सेलू पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला होता या माहितीच्या आधारे सदरचा हायवा हा आष्टी मार्गे पुढे माजलगाव कडे गेल्याची माहिती परतुर पोलिसांना सेलू पोलीस स्टेशनकडून देण्यात आली होती त्या अनुषंगाने परतुर पोलिसांनी रात्रीची गस्त घालत असता सदरचा हायवा दिसला त्यांनी पाठलाग केला असता हयवा रस्ता कडेला सोडून चालक शेतातून पळून गेला सहाय्यक फौजदार भिसे व नाईक पोलीस कॉन्स्टेबल कांगणे परतुर पोलीस स्टेशन येथे जाऊन सदरील हायवा त्यांनी ताब्यात घेतला सदरील हयवा सेलू पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला आहे सेलू पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईची कौतुक सर्वत्र होत आहे