
सेलू :मराठवाड्यातील सूसज्ज दर्जाच क्रिकेट स्टेडीयम उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शुक्रवार १७ रोजी स्व.नितिन लहाने चषक क्रिकेट स्पर्धेला भेट प्रसंगी केले.यावेळी स्व.नितिन लहाने कला व क्रिडा मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने,सचिव संदिप लहाने,डाँ.संजय रोडगे ,भाजपा तालूकाध्यक्ष दत्तराव कदम,भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभोरे,कपिल फूलारी,शिवहरी शेवाळे,अशोक सेलवाडीकर,पांडूरंग गजमल,पोलीस उपनिरिक्षक माधव लोकूलवार,भागवत दळवे,बाबा काटकर,अविनाश शेरे,पांडूरंग कावळे,गजानन गात आदींची उपस्थीती होती.शहरात स्व.नितिन लहाने कला व क्रिडा मंडळाच्यावतिने निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मागील २५ वर्षापासून करण्यात असून स्पर्धेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेस राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सदिच्छा भेट देवून स्पर्धेस शूभेच्छा दिल्या तसेच पूढे बोलतांना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की,महाराष्ट्र क्रिकेट असोसियशन सोबत चर्चा करून सेलू शहरात माजी उपनगराध्यक्ष संदिप लहाने हे स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करणार असल्याने मराठवाड्यातील सूसज्ज क्रिकेटचे स्टेडियम उभारूण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल.तसेच बि.सि.सि.आय चे सचिव आमदार अशिष शेलार यांच्याची चर्चा करणार असल्याचेही यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी म्हटले.यावेळी मैदानात उतरलेल्या दोन्ही संघाच्या खेळाडून शूभेच्छा दिल्या.यावेळी स्व.नितिन लहाने कला व क्रिडा मंडळाचे पदाधिका-यांची उपस्थिती होती.
