
सेलू : सेलू येथील नूतन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्मृतिगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे ( लातूर ) यांच्या हस्ते बुधवारी, २२ जानेवारी रोजी होत आहे.
प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या पं.या.तरफदार सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य द.रा.कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्राचार्य कुलकर्णी यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, गौतम सूर्यवंशी आणि संपादक मंडळाने केले आहे.
