
(दिनांक 21 जानेवारी 2025) समाजात कितीही वाईट प्रवृत्तीची लोक असली तरीही आपण आपला चांगुलपणा सोडू नये अन्यायाविरुद्ध आपण सतत लढत राहिलं पाहिजे आणि आपल्या न्यायाचा रथ चालवला पाहिजे. यासाठी चांगली माणसं जोडणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सभा धीटपणा अंगीकारावा जो प्रयत्नांनी येतो.
असे प्रतिपादन ह. भ. प .प्रसाद महाराज काष्टे यांनी केले काजळी रोहिना येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोप समारंभात मंगळवार (दिनांक 21) रोजी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस. एम. लोया हे होते. नूतन महाविद्यालयाचे काजळी रोहिना येथे ‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हा विषय असलेले शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ह भ प प्रसाद महाराज काष्टे पुढे म्हणाले की,” युवकांनी सतत आपल्या ध्येयाचा ध्यास धरावा आणि ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावेत सातत्य आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. परीक्षेत यश मिळवण्या सोबतच एक चांगला व्यक्ती सुद्धा व्हावे असे ते म्हणाले. “
यावेळी व्यासपीठावर नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड, काजळी रोहिण्याचे सरपंच भारत इंद्रोके उपसरपंच भारत काष्टे, मुंजाभाऊ काष्टे, सचिन इंद्रोके, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुरेश उगले, प्राध्यापक विशाल पाटील, प्राध्यापक डॉक्टर कीर्ती निरालवाड, प्राध्यापक डॉक्टर शिवराज घुलेश्वर, प्राध्यापक महेश कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर आर जे नाथांनी, प्राध्यापिका अर्चना ठोंबरे, प्राध्यापिका शुभांगी नायकल आदी उपस्थित होते.
या समारोप प्रसंगी नूतन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजाराम झोडगे, प्राध्यापक डॉ. राजाराम खाडप ,प्राध्यापक हेमचंद्र हडसनकर ,प्राध्यापक श्याम गरुड, प्राध्यापक प्रसाद पांडे, प्राध्यापक विलास खरात,यांनी विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गिराम तर आभार नंदिनी शिंदे हिने मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता रिठे ,रंगनाथ सोळंके ,पंकज मगर ,मनोज सोळंके, पिनू पांचाळ यांनी सहकार्य केले.