रौप्य महोत्सवी नितीन चषक स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धा

सेलू:- नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ‌आहे. नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगणावर ‌ ‌दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी तहसिलदार डॉ.शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, प्रसिद्ध उद्योजक आर.बी.घोडके, नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ. हरीभाऊ काका लहाने, सचिव संदीप भैय्या लहाने, तालुका प्रमुख बाबा काटकर, मिलिंद सावंत, कल्याण पवार, हरीभाऊ काळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे आदी मान्यवर उपस्थित.
स्व. नितीन चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता अक्सर संभाजीनगर तर उपविजेता यंग इलेव्हन संभाजीनगर ठरला.

  बक्षीस वितरण सोहळ्यात लावणी फेम गौतमी पाटील, श्रीकांत विटेकर, मा. आ. हरिभाऊ काका लहाने, .ॲड अशोक अंभुरे, उपसभापती नारायण भिसे, पवन आढळकर, मिलिंद सावंत, सचिव संदीप भैय्या लहाने बाबा काटकर आदी मान्यवर च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

नितीन चषक क्रिकेट स्पर्धा प्रथम बक्षीस अक्सर संभाजीनगर संघाने 2 लाख रु व चषक, रोख पारितोषिक आ. राजेश दादा विटेकर यांच्या वतीने देण्यात आले. चषक नामदेव डख यांच्या वतीने देण्यात आले.
व्दितीय बक्षीस यंग इलेव्हन संभाजीनगर रोख 1 लाख रु ह.प.प आचार्य रामेश्वर महाराज यांच्या वतीने देण्यात आले.
मालिकावीर पुरस्कार शेख मुक्कीम यास 21 हजार रुपये व चषक न्युज अरिहंत गॅस एजन्सी पारस काला यांच्या वतीने देण्यात आले.


‌ ‌ अंतिम सामना
अक्सर संभाजीनगर विरुद्ध ‌ यंग इलेव्हन संभाजीनगर यांच्या दरम्यान ‌अक्सर संघाने प्रथम फलंदाजी करत 19 षटकात 219 धावा करत 6 गडी बाद झाले. यात मोऊद्दीन शेख 31 प्रवीण दे शेट्टी 67,‌ सलमान अहमद 34, विनायक भोईर 39 धावा केल्या.
‌ यंग इलेव्हन संभाजीनगर च्या वतीने ‌ स्वप्निल चव्हाण यांनी 03 गडी बाद केले अमित पाठक व सय्यद अब्दुल यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले.
‌ यंग इलेव्हन संभाजीनगर ने 219 चे लक्ष काढताना‌ 19 षटकात 158 धावांत सर्वं गडी बाद झाले.
यात ‌ अमित पाठक 38, इंद्रजीत उडान 36, नितीन फ्लोन 24,शुभम मोहिते 14 धावांचे योगदान देऊ शकले.
अक्सर संभाजीनगर संघाच्या भेदक गोलंदाजीत ‌शाश्वात पाठक 3 गडी तर उमर खान व प्रतिक भालेराव यांनी प्रत्येकी 2-2 गडी तंबूत पाठवून 61 धावांनी नितीन चषक जिंकले.

‌ पंच: सय्यद जमशेद,महेश जहागिरदार , समालोचक -पवन फुल माळी, यासेर शेख, विजय वाघ ,गुणलेखक – सलमान सिद्दिकी -यूट्यूब लाइव्ह – डायरेक्टर – दीपक निवळकर कॅमेरामन – वैभव सरकटे, माझ अन्सारी, काफिल बागवान हे काम पाहत आहेत.
माधव लोकुलवार, गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर, हमीद गुत्तेदार, बंडू देवधर, रमेश दुसरे, मोहनराजेबोराडे, अब्दुल भाई, पांडुरंग कावळे ‌,धनंजय कदम,राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, दीपक निवाळकर गजानन शेलार, कपिल ठाकूर,मसूद अन्सारी, अभिजीत चव्हाण , सलमान सिद्दीकी, झीशान सिद्दीकी, मोईन शेख,सुरज शिंदे, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button