
सेलूतील ब्रह्माकुमारी विद्यालयाचे आयोजन..
सेलू /परभणी : सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने श्री साईबाबा मंदिरात आयोजित राष्ट्रीय प्रवचनकार ब्रह्माकुमारी राजयोगिनी भारतीदीदी यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान महोत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारी, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. या वेळी झालेल्या यज्ञामध्ये व्यसन, विकार, आजार, ताणतणाव, समस्या, संकटे आदींची पूर्णाहुती देण्यात आली.
महोत्सवात २७ जानेवारीपासून ब्रह्माकुमारी राजयोगिनी भारतीदीदी यांनी श्रीमद् भगवद्गीतासारचे महत्त्व विशद केले. या वेळी ब्रह्माकुमारी शांता बहेन, नंदा बहेन, अर्चना बहेन आदींची उपस्थिती होती. भारती दीदी यांनी सांगितले की, समाजातील सद्य परिस्थिती पाहता, धर्मग्लानीची वेळ आली आहे. वाढत्या फॅशनच्या दुनियेत भारतीय संस्कृती अधिकच हरवत चालली आहे. त्यासाठी संयम, मर्यादांचे पालन करावे, अहंकार, द्वेष, मत्सर आदी विकारांना दूर ठेवा. सर्वांप्रती स्नेह आणि निस्वार्थ भाव ठेवावा. रामराज्याची पुनर्स्थापना आणि विश्व कल्याणासाठी दैवी गुण आणि अध्यात्मिकता अंगी बाणविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महोत्सवात सकाळी सहा ते आठ यावेळेत म्युझिकल एक्झरसाइज मेडिटेशन तणावमुक्त तणावमुक्त जीवन शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज दिव्य चैतन्य देखावे सादर करण्यात आले. यामध्ये स्वप्नाली गुंजाळ, श्रुती वायाळ, सान्वी हेलसकर, अहिल्या मोगल, हरिप्रिया घांडगे, जिजाई मोगल, सारिका पवार, स्वरा चव्हाण आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक सविता बहेन यांनी केले. सूत्रसंचालन सीमा बहेन यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी सविता बहेन, सीमा बहेन, शांता बहेन, नंदा बहेन, अर्चना बहेन, सरिता बहेन, शारदा बहेन, योगिता बहेन, वैष्णवी बहेन, वैशाली बहेन, सीमा बहेन, प्रणिता बहेन, राधा बहेन, शिल्पा बहेन, रेखा बहेन, रूपा बहेन, सारिका बहेन, श्रुती बहेन, रूपाली बहेध, जया बहेध, सोनू बहेन, श्रुती बहेन आदींसह ब्रह्माकुमारी परिवाराने परिश्रम घेतले. महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला, पुरूष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सेलू (जि.परभणी) येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान महोत्सवाची सांगता रविवारी झाली. या वेळी दिव्य चैतन्य देखावा सादर करण्यात आला. दीपोत्सव साजरा झाला.
पूर्ण….