पाच एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० सुमारास चिकलठाणा परिसरातील शेतकरी हकीम खान आशरफ खान पठाण यांच्या शेतातील हरण्या रंगाचे बैल जोडी अंदाजे किंमत ७० हजार रुपये असणारी शेतीतील आखाड्यावर बांधले व जेवण करण्यासाठी घरी निघून गेले व त्यानंतर थोड्या वेळाने बैलांना वैरण टाकण्यासाठी शेतीतील आखाड्यावर आले असता तिथे बैल जोडी दिसला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या नातेवाईकास व पोलिसात फोन करून आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता खूपसा पाठीच्या जवळ रोडवर साईबाबा मंदिराच्या बाजूस परमेश्वर लक्ष्मण शिंदे राहणार देवला पुनर्वसन अशा व्यक्तीला बैलजोडी घेऊन जात असता पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस हवालदार सूर्यवंशी व कांगणे यांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक बोरसे साहेबांच्या आदेशानुसार सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे..