सेलू प्रतिनिधी
गेल्या ८ वर्षापासून सातत्याने चालू असलेल्या या रामनवमी शोभायात्रेचे यावर्षी ९ व्या वर्षात पदार्पण करताना
श्रीराम जन्मोत्सव समिती व तुम्ही आम्ही सेलुकर आयोजित पारंपारिक भव्य शोभायात्रा हजारो सेलूकरांच्या उपस्थितीमध्ये थाटात संपन्न.
सकाळी ०८:०० वाजता शोभायात्रेची सुरुवात बाबासाहेब महाराज मंदिर पासून सुरुवात होऊन ठीक १२:०० वाजता राम जन्माच्या वेळेस सारंग गल्लीतील हनुमान मंदिर महाआरती करत रोकडिया हनुमान मंदिर मोंढा येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण दिल्ली येथील महाकाल अघोरी नृत्य पथक, उज्जैन येथील झांज पथक हे ठरले शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार ,प्रभू श्रीरामाचा सजीव दरबार ,मुलींचे लेझीम पथक प्रभू श्रीरामाच्या गीतावर मुलींचे सांस्कृतिक नृत्य ,विठ्ठल रुक्मिणी वारकरी भजनी मंडळ जेसीबीने पुष्पवृष्टी इत्यादी देखाव्यांचा सहभाग होता शोभायात्रेचे जागोजागी नागरिकांकडून पुष्पवृष्टी व वागत करण्यात आले
पारंपारिक पालखी मार्गाने निघत असलेल्या या रामनवमीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले दरवर्षी आपल्या नवीन देखाव्याने सेलू शहराचे लक्ष नेहमीच केंद्रित करत रामनवमीने सर्वत्र आपल्या नियोजनाचे व कार्याचे ठसा उमटत रामनवमी यशस्वीरित्या पार पाडली.