प्रतिनिधि सतिश आकात
आज दिनांक ०९/०४/२०२४
श्री साई महोत्सव गुढीपाडवा व श्रीराम जन्माच्या पावन पर्वावर सेलू नगरी श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे शिष्य श्री साईबाबांच्या मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजन करण्यात आला आहे या महोत्सवाची सुरुवात आज सुंदर माझी गुढी या स्पर्धेने झाली आहे ही स्पर्धा असली तरी महिला भगिनींसाठी स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये सेलू शहरातील शंभर अधिक महिलांनी सहभाग नोंदवला व गुढी उभारून आपल्या कलेचे प्रदर्शन केले व गुढीच्या माध्यमातून विविध संदेशाचे सादरीकरण केले सेलू माजी नगराध्यक्ष विनोद रावजी बोराडे व विनोद बोराडे मित्र परिवारातर्फे या स्पर्धेचे सुंदर प्रकारे नियोजन करण्यात आले