@ ७३ वा वर्धापन दिन
सेलू / प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू येथे ७३ वा संस्था वर्धापन दिन (२८ जून ) उत्साहात साजरा करण्यात आला. हरिभाऊ चौधरी पुढे म्हणाले की संस्कृती ,संस्कार व गुणवत्तेच्या माध्यमातून संस्थेने नाव लौकिक प्राप्त केला आहे.भारतीय शिक्षण प्रणाली व आपल्या इतिहासाचा वसा व वारसा संस्था आजही जपत आहे. व्यासपीठावर स्थानिक कार्यवाह उपेंद्रजी बेलूरकर, शालेय समिती अध्यक्ष श्रीमती करुणा कुलकर्णी व्यवस्था मंडळ सदस्या लीलाताई देशपांडे , गणेशकुमार कोठेकर,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.वर्धापन दिनाची सुरुवात धजवंदनाने झाली. प्रार्थना व राष्ट्रगीत यांचे गायन झाले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या इतिहासाची माहिती शिक्षक विनोद मंडलिक यांनी दिली.या निमित्ताने प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.मोरया प्रतिष्ठानचे अभिजित राजूरकर व प्रतिष्ठानच्या इतर सदस्यांतर्फे वीस झाडाचे वृक्षारोपणकरण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपनासाठी जबाबदारी देण्यात आली. संस्थेच्या वार्षिक नियोजन पुस्तिकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी इयत्ता पाचवीच्या नियोजनासाठी संस्कार केंद्रातील शिक्षकांनी जो सहभाग नोंदवला त्यानिमित्ताने अनिल कौसडीकर,शंकर राऊत,विजय चौधरी यांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे यांनी केले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यातआले. अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.