सेलू÷ दि 2 जुलै शहरातील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामात बाल विद्या मंदिर आंबेडकर नगर येथील गरीब व होतकरू विद्यार्थास शहराचे भाग्यविधाते दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
दि 2 जुलै मंगळवार रोजी जिजामात बाल विद्या मंदिर परिसरात श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रविंद्र पाठक, प्रमुख पाहुणे प्रा के.डी.वाघमारे, जेष्ठ पत्रकार नारायणराव पाटील, कथाकार भगवानराव कुलकर्णी, महिला मंडळ सचिव ललिता गिल्डा, महिला मंडळ उपाध्यक्षा करूणा कुलकर्णी, संयोजक सुनिल गायकवाड, प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, पि,के,शिंदे, निर्मिक कोचिंग क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे,डाॅ .रमेश वाकचौरे, शंकरराव गात, आदि उपस्थित होते.
निर्मिक कोचिंग क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी श्रीरामजी भांगडिया यांच्या जिवणचरित्रावर आधारीत गीत सादर करून अभिवादन केले ते म्हणतात श्रीरामजी भांगडिया सेलूचे भाग्यविधाता सेलू शहरात नव्हता असा नेता
नगराध्यक्ष सेलूचे होते पहिले नूतन संस्थेचे त्यांनीच स्वप्न पाहिले
सेलू शहराच्या विकासाचा ध्यास होता.
प्रास्ताविक मुख्य संयोजक शहरातील सामाजिक सुनील गायकवाड यांनी केले ते म्हणाले कि या उपक्रमाचे प्रेरणास्थान कै.दत्तात्रय हेलसकर असुन श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त हात मदतीचा उपक्रम राबविण्यात शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व व सहकारी मित्र यांच्या योगदानातून हा उपक्रम चालतो गरजु विद्यार्थी किंवा एक पालक असेल तर त्यांची परिस्थी पाहुण वर्ष भर शालेय साहित्य दिले जाते .
मागील सहा वर्षांत 2337 विद्यार्थास शालेय साहित्य वाटप करण्यात आले असुन या वर्षी वर्ष 7 वे सुरू आहे हात मदतीचा उपक्रमास सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्त्व यांचे हात वाढत असल्या मुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य वाटप होत आहे.
देवान दिलय त्यातल इतरांनाही द्याव
देव होता नाही आल तरी माणूस म्हणून जगाव दानशूर व्यक्तिमत्त्व यांचे आभार मानले
तर प्रमुख पाहूने कथाकार भगवानराव कुलकर्णी यांनी विद्यार्थास मार्गदर्शन केले या स्तुत्य उपक्रमास आर्थिक सहकार्य वाढत असल्या मुळे विद्यार्थास शालेय साहित्य मिळत आहे परंतु आपला_माणूस सुनील गुलाबराव गायकवाड यांचा हात मदतीचा उपक्रमांसाठी जो विश्वास आजपर्यंत मिळवला आहे हे संस्कार आईवडीलांचे आहेत देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणार्याने देणार्याचे एक दिवस हात घ्यावेत के.डी वाघमारे
करूना कुलकर्णी, नारायणान पाटील, शुकाचार्य शिंदे यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनिल गायकवाड तर सूत्रसंचालन मंगेश शेळके आभार भगवान पावडे यांनी माणले
कार्यक्रमाच्या यशेश्वितेसाठी विजयमाला काळे,तुकाराम अंभुरे,कृष्णकांत खापरखुंटीकर, विष्णू कटारे,सुनील राठोड, बाळू धनवे, शेख सादेखा आदिनी परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न झाला