महाराष्ट्रातील महायुती शासनाच्या विविध फसव्या घोषणा, जाहिरातबाजी करूण घोर निराशा पदरात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे जिवावर स्थापण केलेल्या सरकारला त्यांची जागा दाखविण्या करीता सेलू जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज सेलू येथे भव्य शेतकरी अक्रोश मोर्चाचे आयोजन माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक पुतळा ते उपजिल्हाधिकारी कार्यालय परत या मोर्चा काढण्यात आला सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या वेळी हेमंतराव आडळ कर, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामनाना पाटील, नामदेव डख, पवन आडळ कर, सुधाकर रोकडे, रणजीत गजमल, रमेश डख, बाळासाहेब भांबळे, प्रकाश मुळे, मुरलीधर मते, रामेश्वर पौळ, माजीद बागवान, पुरुषोत्तम पावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार विजय भांबळे यांनी सभेला संबोधित केले. परभणी जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. मात्र, पालकमंत्री बैठक घेत नाहीत. केवळ झेंडावंदनला हजेरी लावत आहे. जिल्हाभरातील विविध प्रश्न यामूळे प्रलंबित राहतात. रोहयो अंतर्गत सेलू, जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीची शेतकऱ्यांची कामे सत्ताधारी आमदारांनी बंद केल्याने पाच हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर ३५ हजार मजूरांच्या हातचे काम हिसकावून घेण्याचे पाप केले गेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वृक्ष लागवड केली. मात्र, सत्ताधारी आमदारांनी वृक्ष लागवडीमध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना येणारा सरकारचा निधी बंद केला आहे. असा आरोप माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केला.
सदरील मोर्चातुन खालील मागण्या करण्यात येणार आहेत..
१) शेतकऱ्याने ज्या ज्या पिकाचा पिकवीमा भरला आहे आशा सर्व पिकांचा १००% पिकवीमा सरसगट शेतकऱ्यांना देण्यात यावा.
२) पीक विमा भरताना शेतकऱ्यांच्या सातबारावरचे नाव तात्काळ दुरूस्तु करून देण्यात यावे.
३) पी.एम. किसन योजनेचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना तक्रार करूणही मिळाले नाही. तरी ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरजमा करण्यात यावे.
४) शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी.
५) सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे बँकेतील कर्ज प्रकरणे तात्काळ मार्गी लावावे.
६) शेतकऱ्यांच्या मालाला कापुस १२,००० हाजार रूपये, सोयाबीन ७५०० हाजार रूपये प्रमाणे हमी भाव मिळाला पाहिजे.
७) नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये सानुगृह अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे.
८) वयोवृध्द शेतकऱ्यांचे शासकिय आनुदान व विमा रक्कम केवळ के. वाय. सी. होत नसल्याने मिळत नाही आस्या शेतकऱ्यांना आकांऊट पे चेक व्दारे देण्यात यावी
९) शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित दिवसा १८ तास लाईट देण्यात यावी.
१०) सेलु तालुक्यातील हादगाव पावडे येथे काही वर्षापासुन १३२ के. व्ही. मंजुर झालेले आहे त्या १३२ के. व्ही. चे काम तात्काळ सुरू करण्यात यावे
११) शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरीचे कुशलचे बील तात्काळ अदा करण्यात यावे.
१२) रमाई आवास योजनेचे मंजुर घरकुलचे पैसे लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे व बऱ्याचा गावाचे नवीन प्रस्ताव दाखल
केलेले आहेत ते तात्काळ मंजुर करण्यात यावे.
१३) अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीरीचे व घरकुचे मंजुर झालेले पैसे लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे व बऱ्याच गावातुन नवीन
विहीरीचे व घरकुलाचे प्रस्ताव दाखल केले आहे ते तात्काळ मंजुर करण्यात यावे.
१४) यशवंतराव चव्हाण व पंतप्रधान मोदी ओबीसी, शबरी, अल्पसंख्याक आवास घरकुल योजनेचे बऱ्याच गावातील प्रस्ताव दाखल आहेत ते तात्काळ मंजुर करावे.
१५) विजरोधक यंत्र तलाठी सञ्जाच्या गावात तात्काळ बसविण्यात यावेत.
१६) अवकाळी पाऊस वाऱ्यात ज्या शेतकऱ्यांचे सोलार पंप पत्र्याचे शेडचे झालेले नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे.
१७) प्रजन्यमापक यंत्र प्रत्येक गावत बसविण्यात यावे.
१८) शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यापासुन होणारे नुकसान रोखण्यासाठी त्यांना कंपाऊंड तारेसाठी अनुदान देण्यात यावे.
१९) श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार, विधवा, परित्यक्ता योजनेसाठी उत्पन्नाची २१,००० रुपयांची अट रद्द करून ५०,००० रूपये एवढी उत्पन्नाची
मर्यादा करण्यात यावी, सेलु व जिंतूर तालुक्यात संजय गांधी, श्रावण बाळ, विधवा, परित्यक्ताचे नवीन प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते प्रस्ताव मीटींग घेऊन मंजुर करण्यात यावेत.
२०) शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुरनगठन करण्यात यावे.
२१) सीबीलची कुठलीही अट ठेवण्यात येऊ नये.
२२) पुढील महामंडळाची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजुर करून निधी वितरित करण्यात यावा.
१) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ मर्यादित
२) लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आर्थिक विकास महामंड
३) महिला आर्थिक विकास महामंडळ
४) संत रोहिदास चरमोद्योग व चर्मकार विकास महामंडळ
५) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
६) वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ
७) महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ
८) शबरी वित्त विकास महामंडळ व इतर महामंडळे.
या प्रमुख मागण्या या मोर्चा मार्फत मागण्यात आल्या..