सेलू :-
दरवषी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांना साईबाबा नागरी बँक चे अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर व माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर वतीने क्रांती चौक येथे सकाळी 8 वाजता फराळाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या वेषभूषेत अनेक चिमुकले फार आकर्षक दिसत होते. यावेळी सर्व शाळेने काढलेल्या वारकरी दिंडीचे स्वागत तुळस चे रोप (झाड )देऊन करण्यात आले.
यावेळी साईबाबा नागरी सहकारी बँक चे अध्यक्ष श्री हेमंत आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, रवी सुरवसे, योगेश कुलकर्णी, सभाजी पवार,संदीप आडळकर, चंद्रशेखर मुळावेकर,इमत्याज अलीखान, नृसिह हरणे,दत्ता पौळ, संतोष हुगे, रफिक भाई, शेख दिलावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.