सेलू प्रतिनिधि
आज आषाढी एकादशी च्या निमित्त वारकऱ्यांचा समृद्ध वारसा व्हिजन इंग्लिश स्कुल च्या इ. 4 ती ये 8 वी च्या विद्यार्थ्यांनी सेलू नगरी मध्ये साकारला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण विठ्ठल रुख्मिणी सहित कान्होपात्रा,ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे जिवंत देखावे तसेच, सेलूतील विविध ठिकाणी सादर करण्यात आलेले लेझीम नृत्य व रिंगण सोहळा हे ठरले. सेलूतील महिला भगिनींनी बाल रूपातील विठ्ठल – रुक्मिणी तथा संत मंडळी यांचे औक्षण करून दर्शन घेतले,त्याचबरोबर व्हिजन इंग्लिश स्कुल ने सादर केलेली भारताच्या विश्वचषक विजयाची झाकी सेलूवासियांना विशेष भावली. मराठमोळा संस्कार विद्यार्थ्यांच्या अंगी बनविण्याच्या या उपक्रमाचे सर्वानी कौतुक केले याकरिता श्री गजानना सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी सर , युनिट हेड श्री मनीष बोरगावकर सर, साजिद सर व शाळेचे प्रिंसिपल श्री हर्षद पांडव सर यांनी शुभेच्छा दिल्या. व्हिजन इंग्लिश स्कुल च्या सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.