दि. 18 गुरूवार रोजी शहरातील समतानगर भागातील श्रीराम मंदिरात वैराग्यमूर्ती किर्तन महर्षी मराठवाडा भुषण श्री.ह.भ.प.वै.मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन समतानगर भागातील श्रीराम मंदिर मध्ये करण्यात आले शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड व ह भ प गिरी महाराज यांच्या हस्ते मारोतराव महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी डाॅ .विलास घुले,लक्ष्मण जाधव, एकनाथ जाधव, मदनराव मानवतकर, ज्ञानोबा गोरे,प्रसाद लाटे,विक्रम पांचाळ,शिवाजी शिंदे,ज्ञानोबा फासाटे,मधुकर तावरे, आदि उपस्थित होते