प्रतिनिधी सतीश आकात
दिनांक 17 जुलै रोजी अनोळखी चार व्यक्तींनी संगणमत करून करणसिंग टिक्का साउँद वय 25 वर्ष व्यवसाय हॉटेल कामगार रा.धनगडी ता. कैलाली जि.टिकापुर नेपाळ
ह.मु.परीवार हॉटेल सेलु व त्याचे सोबतचे मित्र पुरण हरीबहादुर हे सन्ध्याकाळी 07 च्या सुमारास सेलु शहरामध्ये जावुन किराणा सामान घेवुन परत नुतन महाविद्यालय सेलु रोडने पायी परत जात असतांना M.S.E.B कार्यालयासमोर नुतन महाविद्यालय रोडवर चार अनोळखी आरोपींनी रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत दोघांना रस्त्यात आडवुन पुरण याचे गळ्याला एक अनोळखी आरोपीने चाकु लावला. व मोबाईल दे असे म्हणाला दुस-या अनोळखी आरोपीने त्याचे हातातील व्हीवो कंपणीचा मोबाईल किंमती 18,000/- रूपयाचा हिसकावुन घेतला. पुरण हरीबहादुर यास दाबुन धरले व अनोळखी आरोपीने याने त्याचे खिशातील पैशे जबरदस्तीने हिसकावुन घेतले.
राष्ट्रीय महामार्ग 548 बी वरील पथदिवे अद्यापही चालू झालेले नसून होणाऱ्या अपघातांसह आता चोरटे सुद्धा या अंधाराचा फायदा घेत आहे..
तसेच या चार संशयित चोरट्यांनी पुढे प्रवीन दत्ता पारवे रा. देऊळगाव गात ता सेलु हे त्यांचे मोटारसायकलवर बसुन देवुळगावगात रोडने जात असतांना वरील चार अनोळखी ईसमांनी चाकूचा धाक दाखवुन कसुरा नदिच्या, पुलाजवळ रात्री 08.00 वा.सु त्याचे जवळील रेडमी कंपणीचा मोबाईल व खिशातील नगदि पैशे जबरदस्तीने हिसकावुन घेतल्याचे घटना घडली आहे आहे. म्हणुन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांचे आदेशावरुन गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी स.पो.नी संजय चव्हान यांचेकडे देण्यात आले..