प्रतिनिधि सतिष आकात
सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पिक पाहणी करून सुद्धा अनुदानापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्याची तहसीलदार सेलू कडे मागणी.आज रोजी तहसीलदार सेलू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सेलू तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या विभागामार्फत गाव पातळीवर सोयाबीन व कापूस ई पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे.दिनांक 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार इपिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत 5000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे परंतु खरीप हंगाम 2023 ची ईपिक पाहणी करून सुद्धा सेलू तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांचे आपल्या विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या ई पीक नोंदणी यादीमध्ये नावे समाविष्ट नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत तरी याप्रकरणी तातडीने दखल घेऊन 2023 च्या खरीप हंगामातील ईपीक पाहणी करून सुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटपासाठी राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावे नसता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी जयसिंग शेळके, लक्ष्मण बोराडे, हरिप्रसाद काष्टे, भगवान मुळे, गोविंद शेवाळे, मारुती खोशे, दगडोबा जोगदंड, गजानन टाले, अशोक बोराडे, विनोद पारवे, अर्जुन पारवे, सखाराम पारवे, विठ्ठल काकडे, अशोक शिंदे, दौलत भवाळ, बळीराम नजान, शेख मुस्तफा व शेतकरी उपस्थित होते…