जिंतूर तालुक्यातील करवली येथील घटना..
कौसडी प्रतिनिधी
पत्नीवर सतत संशय घेत पती पत्नी सोबत वारंवार भांडण करत राहायचा संशयेच्या कारणाने पतीने पत्नीवर अवताच्या पासने वार करत जागीच ठार केल्याची घटना दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. जिंतूर तालुक्यातील करवली येथील सतीश गिरी हे आपल्या पत्नी ज्योती गिरी व मुला बाळांसोबत शेत आखाड्यावर राहत होता.
दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी पत्नीवर संशय घेत पती सतीश गिरी याने भांडण केले रागाच्या भरात सतीश गिरीने पत्नी ज्योती गिरी वर औताच्या पासने वार करत जागीच ठार केले. ग्रामस्थांनी ज्योती गिरी यांना चार चाकी वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी तपासून ज्योती गिरी याला मृत घोषित केले. पत्नी ज्योती ही आपण केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पती सतीश गिरी हे ग्रामीण रुग्णालयातून पसार झाला. बोरी पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या काही तासातच सतीश गिरीला अटक केले.
डॉक्टर बी के पवार यांनी ज्योती गिरी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत्य महिलेला एक लहान मुलगा व एक लहान मुलगी आहे. बोरी पोलीस ठाण्यात आरोपी सतीश गिरी याच्यावर पत्नी ज्योती गिरी याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.