प्रतिनिधी सतीश आकात
दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी रात्री च्या वेळेस बालाजी बमंदिर वालूर येथे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे 30 हजार रुपये चोरले व तसेच तो पुढील काही अंतरावर असलेल्या कालिंका देवी मंदिराच्या छतावरून प्रवेश करून मंदिराची दानपेटी फोडून पेटीतील अंदाजे १५ हजार रुपये असे एकूण 45 हजार रुपये चोरून नेले बाबत चि घटना सेलू पोलिस स्टेशन येथे 436/2024 कलम 305,331 गुन्हा दाखल करण्यात आला होता व अशा चोरट्याचा शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांनी दोन पथके तयार करून शोध घेतला असता एक संशयित इसम मेघराज लक्ष्मण दवंडे वय 20 वर्ष राहणार कुपटा तालुका सेलू जिल्हा परभणी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्या दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केले आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख साहेब व पो.ह बुधवंत करत आहेत.