प्रतिनिधी सतिष आकात
-१ हजार ३३८ नोंदणीकृत कामगारांना संसारउपयोगी साहित्य वाटप
सेलू:केंद्रासह राज्य सरकार सर्वसामान्य घटक पूढे ठेवून काम करत असून शासकिय योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यात सरकार यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले.त्या शूक्रवार ३० रोजी कृषी महाविद्यालयात आयोजीत नोंदणीकृत कामगारांना संसारउपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात केले यावेळी डाँ.संजय रोडगे,माऊली ताठे,अँड.दत्तराव कदम,अशोक अंभोरे,रवि डासाळकर,सूंदर गाडेकर,प्रकाश गोरे,गणेश काटकर,अर्जून बोरूळ,वनिता चाफेकर,आदींची उपस्थिती होती.पूढे बोलतांना म्हणाल्या की,देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वसामान्य घटकासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून अमंलबजवणी करत आहेत.तसेच राज्य सरकार देखील सर्व घटकातील नागरीकांसाठी योजना राबवित आहे.मूख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ३० हजार बहिणींना लाभ मिळाल्याचा आनंद मिळत आहे. तर आज १ हजार ३३८ नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप होत आहे.यामूळे कामगारांना जिवनमान उंचविण्यासाठी थोडा हातभार लागणार आहे.तसेच मतदार संघात प्रत्येक गावात जावून भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच योजनादूत योजनांची माहिती देवून योजनेचे अर्ज भरून घेत आहेत कूठल्याही अडचणी आल्या तर योजनादूतांना संपर्क करावा मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी शासकिय योजनेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.यावेळी डाँ.संजय रोडगे,अशोक अंभोरे,अर्जून बोरूळ यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भागवत दळवे तर आभार गणेश काटकर यांनी मानले .या कर्यक्रमास मोठ्या संख्येने नोंदणीकृत कामगारांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल फुलारी,संदीप बोकन, गणेश सवणे, पप्पू शिंदे, बाळू काजळे ,अजय डासाळकर ,शिवहरी शेवाळे, किशोर कारके, भारत इंद्रोके, संजय भाग्यवंत, अशोक शेलार, कृष्णा गायकवाड,प्रकाश शेरे, महेश टाके, नाना मोताळे, रामा डख, सुनील चव्हाण, विवेक कुरनाळे पांडू पांचाळ ,विठ्ठल कोकर, अशोक ताठे, दीपक चव्हाण, खाजा भाई, बाबासाहेब मुळे, सतीश कापसे ,व्यंकटेश भिसे,श्याम चाफेकर, प्रमोद शेरे,वाल्मीक खुळे,लालू पठाण, गोविंद शर्मा ,अमोल भोसले, अभय महाजन आदींनी पूढाकार घेतला.