मेजर ध्यानचंद जयंती निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा संपन्न

सेलू (. )राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती, निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा. दि. २९ ऑगस्ट २०२४, रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव डॉ.व्हि.के.कोठेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोठेकर सर म्हणाले मेजर ध्यानचंद यांच्या जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरी होत आहे. त्यांची प्ररेणा घेऊन नविन खेळाडू निर्माण व्हावे, आज ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत हि आपल्या देशाला यश संपादित केले आहे. सर्वांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- के.के. देशपांडे प्र.मुख्याध्यापक, संजय मुंडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक खो-खो , प्रमुख उपस्थिती: एकनाथ जाधव (केंद्र प्रमुख गटशिक्षणाधिकारी कार्यालय, डी.डी.सोन्नेकर (पर्यवेक्षक), तुकाराम खंटींग,
सतिश नावाडे (जिल्हा सचिव टेनिस व्हॉलीबॉल असो) प्रा.नागेश कान्हेकर,मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे तर सूत्रसंचालन प्रशांत नाईक, आभारप्रदर्शन संजय भुमकर, यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी वर विद्यार्थीनी तयार केलेले चिञप्रदर्शनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा १४/१७/१९ वर्षे मुले मुली गटात आयोजित करण्यात आल्या. ई.पी.सायबर, फाईल तीन प्रकारात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत नाईक, संजय भुमकर, कदम अनुराग आंमटी, राहुल घांडगे, यांनी काम पाहिले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button