उपजिल्हा सामान्य रुग्णालय सेलू आणि जनसेवा मदत केंद्र सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. या शस्त्रक्रिया शिबिरात हर्निया, हायड्रोसील, फिनोसिस, अपेंडिक्स, व इतर गाठी तथा सिस्ट अशा दुर्धर व जिकेरीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.सकाळी आठ वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत चाललेल्या शिबिरात सेलू शहर व तालुक्यातून एकूण 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली . त्यापैकी वरील आजाराच्या एकूण 25 शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या. या शिबिरात तपासणी व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होत्या.
छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध पीडियाट्रिक सर्जन डॉ.अर्जुन पवार यांच्याहस्ते संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडल्या. येथील सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ अरूण (बप्पा) रोडगे, सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर, डॉ. देशमुख, डॉ. चव्हाण डॉ. भुरेवार आदी वैद्यकीय तज्ञांनी डॉ. पवार यांना सहाय्य केले.
जनसेवा मदत केंद्राचे मार्गदर्शक श्री अशोक नाना काकडे यांनी डॉ.अर्जुन पवार, डॉ.जनार्दन गोळेगावकर,डॉ. चव्हाण,डॉ. देशमुख, डॉ.गिरी मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत सामान्य माणसांसाठी असामान्य काम करीत असल्याबद्दल सर्वं वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृदांचे अभिनंदन करून आभार मानले. यावेळी जनसेवा मदत केंद्राचे सर्वश्री सचिन धापसे, चेतन निकम, राजेश पडूळे, प्रवीण जाधव,ललित बोबडे, अनिकेत शिंदे, अभिषेक धापसे, सुनील धापसे,सुरेश बीटे, अशोक जगताप, आमदार पठाण, गोविंद गायकवाड, अशोक उफाडे सोबत होते.