आमदार मेघना साकोरे बोर्डीकरांची आपत्तीग्रस्त गावांना भेटी..

प्रतिनिधी सतिष आकात

सेलू:तालुक्यातील गिरगाव खू ,बोरकीनी व नरसापूर गावाला पाण्याचा वेढा पडला असतांना गावक-यांची अडचण लक्षात घेत आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी रविवार रात्री १०-३० वाजेपासुन रात्री 2 वाजेपर्यंत गिरगाव खू,नरसापूर ,बोरकीनी व वाई आदीं गावांना भेट देवून पशुधन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली

काल रात्रीच्या झालेल्या अतिवृष्टी बोरकिनी तालुका सेलू येथील विठ्ठल हावळे, ज्ञानोबा हावळे, जनार्दन हावळे हे पुराच्या पाण्यामध्ये अडकले शेवटी पाणी पाच फुटाच्या वर गेल्यावर त्यांनी एका झाडावर आश्रय घेतला तब्बल सात घंटे हे या झाडावरच होते, मात्र हे समजतात कर्तव्यदक्ष आमदार मेघना दीदी यांनी रात्री 12:30 वाजता भर पावसात गावाला भेट दिली ताबडतोब मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून NDRF जवानांना पाठवण्याच्या सूचना केल्या.

विठ्ठल हळवे यांच्या पत्नी भावुक झाल्या व दीदी तुम्हीच माझ्या नवऱ्याला वाचूऊ शकतात असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.
अडचणीची सोडवणुक करण्यासाठी पुढाकार घेतला.तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद करून मदतीचे अश्वासन दिले. यावेळी यावेळी तालुका अध्यक्ष एडवोकेट दत्तराव कदम अर्जुन बोरुळ रविदासाळकर अजय डासाळकर अशोक अंभोरे कपिल फुलारी संदीप बोकन शामराव चाफेकर संदीप घुगे गिरगावचे सरपंच नामदेव शिंदे केदारेश्वर मोगल अभय महाजन अमोल भोसले गोविंद शर्मा कृष्णा चव्हाण जयसिंग शेळके बाळासाहेब आघाव भाजपाचे कार्यकर्तेआ मेघना दीदी बोर्डीकर सोबत होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button