@विवेकानंद बालक मंदिराचा स्तुत्य उपक्रम
सेलू / प्रतिनिधी
आई या दोन अक्षरांची जादू या जगामध्ये अजरामर आहे.मुलांना जन्म देणं ,त्यांचं मोठ्या ममतेनं संगोपन करणं ,शिक्षणाचं आणि संस्कारचं शिंपण करून त्याला घडविण्यात आईचा मोलाचा वाटा असतो .तिच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विवेकानंद बालक मंदिरात मातृपूजन (दिनांक ४सप्टेंबर )हा उपक्रम घेण्यात आला.
प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आईचे पाय धुवून ,हळदी- कुंकू व फुले ,अक्षदा तसेच पुष्पहार घालून मातृपूजन केले.व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी ,करुणा कुलकर्णी ,मु.अ. शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.बालवाडी ताई रसिका बावणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली.सूत्रसंचालन विजय चौधरी ,आभार रागिणी जकाते यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर ,काशिनाथ पांचाळ ,शारदा पुरी ,सोनाली जोशी ,मंगेश खरात यांनी प्रयत्न केले.