प्रतिनिधी:- सतिष आकात
गणेश उत्सवात होऊ शकते नागरिकांची गैरसोय..!
सेलू सब डिव्हिजन मध्ये 26 ते 27 कामगारांची संख्या असून अशा बाह्यस्त्रोत कामगारांचे जुलै आणि ऑगस्ट 2024 अशा दोन महिन्याचे वेतन अजूनही मिळाले नसून समर्थ इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स बुलढाणा या एजन्सी द्वारे सर्व कामगार कार्यरत आहेत. एजन्सीला याबाबत विचारले असता एजन्सीला मागील वर्क ऑर्डर असताना आम्ही कामगारांनी एजन्सीला पगार वेतनाबाबत मागणी केली असता एजन्सीचे म्हणणे आहे की 10% एक्स्टेशन मिळाले आहे व आमची वर्क ऑर्डर 31 जून 2024 पर्यंतच होती,असे एजन्सी चे म्हणणे आहे. म्हणून सर्व कामगार सेलू सब डिव्हिजन येथे निस्वार्थ भावनेने महावितरण ची सेवा गेल्या आठ ते दहा वर्षापासून करत आहेत. जुन्या किंवा नवीन एजन्सीला आमच्या वेतनाची सहनशीलता विचारात घ्यावी व कामाची वर्क ऑर्डर व थकीत रक्कम वेतन देण्यास एजन्सीला सांगावे असे निवेदन मागील दोन महिन्यापासून देऊनही अद्यापही त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. थकीत वेतनामुळे कामगारांच्या कुटुंबावर सणासुदीच्या दिवसांमध्ये उपासमारीची वेळ येत आहे. या मुळे आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात कामगार वर्ग जर काम बंद केला तर विद्युत संबंधित येणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता दाट आहे.