टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडीया श्री खंडेराय प्रतिष्ठाण बालेवाडी, पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असो.वतीने टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप 2024-25 चे आयोजन श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे येथे दि. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान एससीपी लक्ष्मण बोराटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गणपतराव बालवडकर (चेअरमन टेनिस व्हॉलीबॉल महा. असो/श्रीखंडेराय प्रतिष्ठाण,)प्रमुख पाहुणे :डॉ व्यंकटेश वांगवाड (टेनिस व्हॉलीबॉल जनक) शरदचंद्र घाररुकर (अध्यय शा.शि शिः महासंघ) मिलिंद क्षिरसागर (उपाध्याय शा.शि शि महासंघ)धर्मविरसिंग जडेजा (कोषाध्याक्ष टेनिस व्हॉलीबॉल महासंघ) नागेश्वर राव (सरचिटणीस कर्नाटक असो.) रामेश्वर कोरडे (विभागीय सचिव महाराष्ट्र) अंजली दळवी (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे (टेनिस हॉलीबॉल सचिव महाराष्ट्र) यांनी केले तर
मनोगत डॉ.व्यंकटेश वांगवाड, यांनी टेनिस व्हॉलीबॉल खेळांची प्रगतीशील वाटचाल सांगितली.
उद्घाटन पर भाषणात बोराटे लक्ष्मण म्हणाले महाराष्ट्र मातीतील टेनिस व्हॉलीबॉल खेळ आज संपूर्ण देशात खेळाला जातो. आशिया खंडातील राष्ट्रात खेळला जातो. या खेळातून संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो याखेळास शासनाने प्रोत्साहन द्यावे.
अध्यक्षीय समारोप गणपतराव बालवाडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रितेश वांगवाड तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल बनसोड यांनी मानले.
फेडरेशन कप साठी देशातील महाराष्ट्र , गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओरीसा, झारखंड, दिल्ली, पॉडेचरी पुरुष व महिला पाञ १६ संघाचा समावेश आहे. दोन दिवसांत प्रकाश झोतात सामने खेळविण्यात येणार आहेत.
पहिला सामना गुजरात वि. केरळा दरम्यान २:० सेट मध्ये गुजरात विजयी झाले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ.दिनेश शिगारम, संदिप भोसले, आशिष ओबेरॉय, गणेश पाटील, राजेंद्र मागाडे आदी परीश्रम घेत आहेत