सेलू तालुक्यातील हादगाव पावडे येथील घटना
सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथे माझ्या घरासमोर लावलेल्या साउंड सिस्टीमवर नाच करत असलेल्या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना का दिली म्हणून दोघा जणांनी पोलिस पाटील महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवार १८ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात दोघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मंगल भागवत पावडे या पोलिस पाटील आहेत. बुधवार १८ सप्टेंबर रोजी गणेश काळे, राधा
काळे यांच्या घरासमोर लाऊड स्पीकरच्या गाण्यावर काही जण नाचत होते. पोलिस पाटील या नात्याने मंगल पावडे यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र तु आमचे घर पोलिसांना का दाखवले म्हणून राधा काळे व गणेश काळे यांनी मंगल पावडे यांनाला लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मंगल पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राधा काळे व गणेश काळे याच्या विरुध्द शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. देशमुख हे करीत आहेत.