माजी आमदार विजयराव भांबळे यांचा पुढाकार
तालुक्यातील किर्तनकार व कथाकार तसेच बाल किर्तनकारांचा भव्य सत्कार सोहळा माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या वतीने पार पडला .
गुरूवार २६ सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळा परिसरातील मैदानात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत
वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य करत समाज प्रबोधन करून समाजाचे हित जोपासणाऱ्या तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार यांच्या सोबतच बाल किर्तनकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला .
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी माजी आमदार ,विजयराव भांबळे ,माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकराव काकडे , प्रेक्षाताई भांबळे ,माऊलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालूरकर ,दत्तराव महाराज सोनेकर ,जयराम महाराज तांगडे ,प्रसाद महाराज काष्टे राजेंद्र लहाने ,नामदेव डख ,प्रकाशराव मुळे ,सुधाकरराव रोकडे ,पप्पू गाडेकर ,पुरुषोत्तम पावडे ,रघुनाथ बागल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते तालुक्यातील ११० कीर्तनकारांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले .