दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी एका अज्ञात व्हाट्सअप क्रमांकावरून आज पावेतो सदरील व्यक्तीस कॉल करून तुमच्या नावे बोगस मोबाईल क्रमांक घेण्यात आला असून आपल्या नावे कॅनरा बँक मध्ये बचत खाते उघडण्यात आलेले आहे व त्याद्वारे बेकायदेशीर रित्या व्यवहार झालेला आहेत व आपल्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे असे खोटे सांगून आपल्या नावे सीबीआयकडून वॉरंट निघालेले आहे व त्या वॉरंटची प्रत इलेक्ट्रिक माध्यम व्हाट्सअप द्वारे फिर्यादीच्या व्हाट्सअप वर पाठवून बनावटीकरण करून त्यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया सीबीआयचे मोहर (शिक्का) वापरून बनावटीकरण केलेले दस्तावेज खोटं असल्याची माहिती असतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने तो खरा असल्याची भासविले व गिरीश दिगंबर सोमन वय वर्ष 55 व्यवसाय नोकरी राहणार शास्त्रीनगर सेलू( मुळगाव नवरंग बाग,समुती नगर,घुलेवाडी,तालुका संगमनेर)यांची एकूण 79,76,045 रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून माननीय पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने कलम 318,336,340,341,351 या द्वारे दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास स्वतः दीपक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करीत आहेत