@शहरातील जनतेला आवाहन
सेलू : ( प्रतिनिधी ):गत सहा वर्षांत शहरातील डि.पी.रस्त्यांना प्राधान्यक्रम देत त्यासोबत स्ट्रीट लाईट ,नाल्या, फुटपाथ इत्यादी विकासाचे कामे करण्यात आली असल्यामूळेच शहरातील नागरीक भाजपासोबत आहेत तसेच आगामी नगरपालिका निवडणूकीतही भाजपाच्या विकासासोबत जनतेने राहून आपल्या विचाराची पालिका निवडूण आणण्याची विनंती माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी बूधवार ८ रोजी शंकरलींगमंदीर देवस्थान सभागृह बांधकाम व फूले नगर येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन प्रसंगी केली.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर,परभणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगावकर, तालुका अध्यक्ष ऍड दत्ता कदम, शहाराध्यक्ष अशोक अंभोरे, शिवाजी खेडकर, भाऊसाहेब सोनवणे ,गणेश काटकर मुख्याधिकारी युवराज पौळ, न.प. अभियंता नागेश पैठणकर,धुळगंडे, बालासाहेब सरकाळे, दिनकर वाघ आदींची उपस्थिती होती.पूढे बोलतांना बोर्डीकर म्हणाले की,विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमदार मेघना बोर्डीकर यांनी गत पाचवर्षात कामे केली असल्याने समाजातील व्यक्तींनी भरभरून मतदान केले म्हणून आज आमदार मेघना बोर्डीकर राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने उभं राहून शहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. समाजातील गरजा ओळखून त्यांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे या मताचा मी आहे.कोणत्याही समाजाचं कामं करताना दुजा भाव न ठेवता सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणारं आहेत.
शहरातील रस्ते, नाल्या, फुटपाथ, स्ट्रीट लाईट, स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून शहरात विकास केला जाणार आहे. यासाठी आपण सर्वांनी हिंदुत्व हा विचार मनात ठेवून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. देशात नरेंद्र मोदीतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असल्यामूळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या विचारांची नगर परिषद आमच्या ताब्यात द्या.व मग विकास कामे कशी होतात ती बघा असे अवाहन यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर,सुत्रसंचलन सचिव प्रा . मिलिंद झमकडे, आभार निलेश मिटकरी यांनी मानले.याकार्यक्रमासाठी गणेश गोरे, अर्जुन बोरुळ, बाळू काजळे, सुनील चव्हाण, प्रकाश शेरे, ,कपिल फुलारी, दत्ताआप्पा मिटकर , बबन आप्पा झमकडे, राजेंद्रआप्पा नावाडे, राजेंद्रआप्पा महाजन, अरुणआप्पा सोळंके, वाल्मीक खुळे गणेश डेंगळे मोहन माने पप्पू शिंदे विठ्ठल कोकर, अशोक कोपुलवार, सुनील काळे, सुनील चव्हाण, गणेश ढेंगळे, आण्णा केवारे, शिवकुमारआप्पा नावाडे, कानडे आप्पा, निजलिंग तरवडगे आदींनी पूढाकार घेतला.