सेलू येथील श्री संत गोविंद बाबा चौक मठ गल्ली मधील जय भवानी नवरात्र महोत्सवास सुरुवात मा.नगरसेवक कै प्रकाशसिंह ठाकूर यांनी ४० वर्षांपूर्वी १९८४ ला या नवरात्र महोत्सवास सुरुवात केली होती,अनेक नामवंत वक्त्यांनी यामध्ये प्रबोधनपर व्याख्याने दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत अखंडित नवरात्र महोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे शहरात मध्यभागी असलेल्या या मंदिरास शहरातील सर्व भाविक भक्त व महिला नवरात्रात येथे येऊन देवीचे दर्शन घेतात, नवरात्रीचे नऊ दिवस भावीक भक्तांची गर्दी पाहता जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेस शहरातून भव्य देवीचा छबिना काढून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते