जिंतूर-सेलू मतदारसंघातील 4 हजार मतदारांची नावे स्थलांतर …

जिंतूर-सेलू मतदारसंघातील तब्बल 4 हजार मतदारांची नावे स्थलांतर व मतदार यादीतून उडवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या संदर्भात आज मा.खा.संजय जाधव साहेब व मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग अधिकारी यांची भेट घेतली.
विशिष्ट व्यक्तीला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी मतदारयाद्यांमधील नावे एका योजनाबद्ध पद्धतीने कमी करण्याच्या प्रकाराविरुद्ध खा. संजय जाधव साहेब व मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी जिल्हाधिकारी यांना या गंभीर प्रकारावर तात्काळ कारवाई करावी व मतदार यादीतून वगळलेली नावे तात्काळ समाविष्ट करावी तसेच बाहेर राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे लोकांचे मतदार यादीत बोगस कागद पात्राच्या आधारे मतदारांची नावे वाढविण्याचे काम सुरू आहे ती तात्काळ थांबवावी अशी मागणी याप्रसंगी करत यावर तात्काळ कारवाई न झाल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी मा.खा.संजय जाधव साहेब, मा.आ.विजयराव भांबळे साहेब, विनायकराव पावडे, नाना बोबडे उपस्थित होते..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button