प्रतिनिधी | रोहित झोल
परभणी तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी रस्ता व कॅनलवर लोखंडी पत्री फुल करून द्यावा या मागणीसाठी येथील मागासवर्गीय बांधव व इतर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार करत असल्याचे निवेदन यशवंत भीमराव सोनवणे,दत्ता विठ्ठलराव काळदाते,विजय रमेशराव काळदाते,विष्णू नारायण सोनवणे,कमलेश ज्ञानोबा ठेंगे, भागवत पाचपुंजे, पंडित भिवाजी कापुरे ,राहुल पुंडलिक पवळे ,गोपीनाथ लिंबाजी शितळे,जनार्दन एकनाथ सोनवणे इत्यादींनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली.