@विवेकानंद विद्यालयाचा सहभाग..
सेलू / प्रतिनिधी
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.रघुनाथ गावंडे ,जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी ,तहसीलदार डॉ.शिवाजी मगर ,गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती निमित्ताने दि.१८ नोव्हेंबर (सोमवार) रोजी येथील ज्ञानतीर्थ विद्यालय ,यशवंत विद्यालय ,न्यू हायस्कुल ,नूतन विद्यालय ,के.बा. विद्यालय ,नूतन इंग्लिश स्कुल ,के.जी.बी.व्ही.शाळा ,विवेकानंद प्राथमिक विद्यालय ,यासेर उर्दू शाळा आदी शाळांनी त्यांच्या परिसरातील मुख्य रोड अथवा चौकात भव्य अशी रांगोळी काढून मतदान जनजागृतीचा संदेश दिला.विवेकानंद विद्यालयाने रायगड कॉर्नर चौकात भव्य अशी रांगोळी काढली.
या उपक्रमासाठी सहाय्यक नोडल अधिकारी रमेश मरेवार ,मनोज देगावकर ,केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक शंकर शितोळे,गजानन साळवे,अनिल कौसडीकर,विनोद मंडलिक,विजय चौधरी,काशिनाथ पांचाळ,रागिणी जकाते,दीपाली पवार,शारदा पुरी, चेतन नाईक,चंदू कव्हळे,मंगेश खरात यांनी प्रयत्न केले.