मानवत शहरातील बाजारपेठ जवळ करण्यासाठी तालुक्यातील ग्रामिण भागातून येणार्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन येण्यासाठी ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देत बाजार समिती मध्ये कापसाची विक्रमी आवक येत असल्याने व मानवत शहर परिसरात जिनिंग युनिट वाढल्याने टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन पाथरी विधान सभेचे महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी दिले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील माहेश्वरी भवन मंगल कार्यालयात शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अंकुशराव लाड, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, प्रकाश पोरवाल, दिलीप हिबारे, कृष्णा बाकळे, रंगनाथ सोळंके यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांच्या यावेळी शिष्टमंडळाकडून मुदगल, इटाळी, उक्कलगाव ते मानवत दरम्यानचा रस्ता त्याचबरोबर सिमुरगव्हाण, मानोली ते मानवत दरम्यान रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे. मानवत ते पाळोदी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून घेण्यात यावे, कोल्हा ते कोथाळा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून घेण्यात यावे, कॉटन हब उभारून टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मानवतरोड रेल्वे स्थानकावर प्रमुख रेल्वे एक्सप्रेसना थांबा देण्यासाठी व्यापारासाठी प्रयत्न करावेत. सुसज्य व्यापारी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा अनेक मागण्या मानवत शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी मानवत शहरातील व्यापारी, डॉक्टर असोशियन, मेडिकल असोसिएशन यांच्याशी संवाद साधताना महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत आणण्यासाठी तसेच वाहन चालकांना त्रास होऊ नये यासाठी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत मानवत येथे येणारी कापसाची विक्रमी आवक लक्षात घेता मानवत कॉटन हब झाले तर . या भागात टेक्सटाईल पार्क उभारून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर व्यापाऱ्याची संवाद साधताना आश्वासन दिले कार्यक्रमाला व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
…