सेलू:शहरातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय यूवा दिन रविवार १२ रोजी साजरा करण्यात आला.यावेळी गोविंद काष्टे,जयसिंग शेळके ,रामेश्वर गटकळ,राहूल लव्हांडे,प्राचार्य लोढें डी.एच यांची उपस्थिती होती .यावेळी मान्यवरांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य व विचार तसेच भविष्यात आयटीआय प्रशिक्षणाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच यूवा दिनानिमित्त आयोजीत विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी के.ए.ब्रम्हपूरकर,बि.डी.वळसे,एस.सी .कासार,पी.एस.जोशी,श्रीमती एम.एस.सातारकर,सविता गादेवाड,प्रथम सूर्यवंशी,सय्यद हनिफ,शेख सलिम सह सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी पूढाकार घेतला.