मुलींनी निर्भयपणे बोलायला शिकावे- मिलिंद पोंक्षे

सेलू : मुलींना केवळ जन्म देऊ नये तर आईवडीलांनी तिचे संरक्षण करावे. आईने मुलीची मैत्रीण होऊन तिला स्पर्श ज्ञान द्यावे. भितीमुळे मुली बोलत नाहीत. न बोलल्यामुळे मुली अधिक संकटात सापडतात. म्हणूनच मुलींनी निर्भयपणे बोलायला शिकावे. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते मिलिंद पोंक्षे यांनी केले. ते पोलिस अधीक्षक कार्यालय, परभणीचा ‘ विद्यार्थीनींशी संवाद विद्यार्थीनी सक्षमीकरणासाठी ‘ या उपक्रमांतर्गत जाणिव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सेलू पोलिस कार्यालय, नूतन विद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात गुरूवार ( दि. ३० ) रोजी कै. रा.ब. गिल्डा सभागृहात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. तर व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, शेख अतिक, दामिनी पथकातील करूणा मालसमिंदर, शालिनी पवार, अस्मिता मोरे , उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल यांची उपस्थिती होती. संपन्न झाले. आपल्या १०५१ व्या व्याख्यानात मिलिंद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, ‘ विद्यार्थीनींनी मोहाचे क्षण ओळखून नाही म्हणायला शिकावे. संकट समयी जोरात ओरडावे.

नजरेला त नजरेनेच उत्तर द्यावे. मुलींसाठी आवश्यक असलेले हेल्पलाइन नंबर १००, ११२ स्वतः जवळ असावेत. ‘ कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश माळवे, सुनिता दायमा, रूपाली लाडाणे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button