द मदर्स प्रि प्रायमरी इंग्लिश स्कुल चे वार्षिक स्नेहमीलन साजरे
सेलू :-प्रतिनिधी
शहरातील द मदर्स प्रि प्रायमरी इंग्लिश स्कुल यांचे वार्षिक स्नेह स्मेलन दिनांक 02/02/25रविवारी रोजी साई नाट्य गृह येथे साजरे करण्यात आले या कार्यक्रम चे अध्यक्ष अल्फलाह एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष श्री महेमूद सर होते तर प्रमुख पाहुणे सौ जयश्री सोन्नेकर मॅडम, जालना येथील महावितरण इंजिनिअर तथा अलफ्लाह एजयुकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री अनिस कुरेशी इंजिनियर,साईबाबा नागरी बंक चे व्यवस्थापक श्री पठाण निसार, केंद्रीय प्रा शाळा हदगांव पावडे चे शिक्षक श्री मौजम सर,द मदर चे संचालक श्री इम्रान कुरेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होति स्नेह स्मेलनातं विध्यार्थी नि विविध ऐतिहासिक व देश भक्ती वर कला नृत्य सादर केले
यावेळी प्रमुख पाहुणे श्री महेमूद सर यांनी प्रतिपादन केले कि
आईनी आपल्या चिमुकल्यांना मोबाईल स्क्रीन पासुन दुर ठेवावे
शेख महेमुद सर यांचे प्रतिपादन
प्रत्येक मातेचे स्वप्न असते त्यांचे मुले शिकून मोठे डाॅक्टर, इंजिनिअर ,अधिकारी, उद्योग पती व्हावे. हे स्वप्न पुर्तिसाठी प्रत्येक मातेने आपल्या पाल्याला लहान पनांपासूनच सुयोग्य संस्कार करावे. त्यांना मोबाईल स्क्रीनपासून दुर ठेवावे. त्यांच्या बौद्धिक व शारिरीक विकासासाठी जंक फूड पासून दूर ठेवावे व हेल्दि फुड खाऊ घालावे. आपला पाल्य मोठं पदावर जाण्यासोबतच त्यांच्या वर्तनात माणुसकी रुजवावी असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू चे उपाध्यक्ष शेख महेमुद सर यांनी केले. द मदर्स प्रि प्रायमरी स्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका जयश्री सोन्नेकर मॅडम, अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू चे अध्यक्ष, विज वितरण कंपनी जालन्याचे कार्यकारी अभियंता अनिस कुरैशी साहेब, साईबाबा नागरी बँक चे व्यवस्थापक पठाण निसार साहेब, मौज्जम सर आदि होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत द मदर्स प्रि प्रायमरी स्कूल चे संचालक उद्योजक इम्रान कुरैशी, प्राचार्य स्वाती नावाडे मॅडम यांनी केले.
या प्रसंगी विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी व पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके वाटप करण्यात आली. चिमुकल्यांच्या रंगारंग कार्यक्रमाने पालक व प्रेक्षकांना मोहीत केले.