चौदा जुगारी ताब्यात,
जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोकड जप्त
सेलू / प्रतिनिधी
शहरातील इक्बालनगर येथील परिसरात गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परभणी येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच रविवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जुगार अड्ड्यावर धाड टाकून १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोकड असा मुद्देमाल जप्त
करण्यात आला असून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इक्बलनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जुगार अड्डा जोमाने सुरू असून याठिकाणी लाखो रुपयांची दररोज उलाढाल होत असल्याची माहिती परभणी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचा पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने रविवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून
जुगार अड्डयावर धाड टाकली. या कारवाईत १४ जुगारी, जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोकड जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याचे समजते. ही कारवाई परभणी गुन्हे अ अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचा मार्गदर्शनाखाली पोउनि वाघमारे, पोलीस कर्मचारी विलास सातपुते, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, संजय हुगे यांनी केली.