सेलू( )मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सेलू येथील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
“राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२४” या उपक्रमात समारंभपूर्वक श्री गणेश माळवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या बद्दल श्री माळवे यांचा शनिवारी नूतन विद्यालयात सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी पी.टी.कपाटे, बाबासाहेब हेलसकर , सुधीर जोशी, भगवान देवकते, अशोक लिंबेकर, संजय भुमकर, सुनील तोडकर, उपस्थित होते.
गणेश माळवे यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण संघटना चार आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जिल्हा आदर्श क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. टेनिस व्हॉलीबॉल राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली 75 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले असुन यात 30 खेळाडूंना महाराष्ट्र शासनाची क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
विविध 09 राज्य क्रीडा स्पर्धा आयोजन केले आहे.
क्रीडा सुविधा निर्माण योजनेंतर्गत व क्रीडांगण विकास योजना घेऊन क्रीडा क्षेत्रात अनेक उपक्रमात सहभागी झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग असतात.
यांच्या कार्यावर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार बदल अभिनंदन अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, महेश खारकर, चंद्रशेखर नावाडे, प्रा. नागेश कान्हेकर, डी.डी. सोन्नेकर, संजय मुंढे, विविध क्रीडा संघटना, शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.